Sunday, July 3, 2011

स्वप्न...

काल रात्री एक स्वप्न आलं.. स्वप्न बघणं माझ्या हातात नाही. मला स्वप्ने पडत ही नाहीत. ती येतात, आणि रात्र रात्र जागवतात...

स्वप्नात आली ती. शिल्पा, नावाप्रमाणे अतिशय सुंदर, मधाळ बोलणं आणि अतिशय मोहक हास्य. १५ वर्षाहून अधिक काळ झाला असेल तिला बघून, तिच्याशी बोलून. पण ती आहेच तशी, कायम माझ्या आठवात राहणारी, कधीतरी एकांताच्या क्षणी मला हळवा करणारी..

फार विशेष असे काहीच घडले नाही, घडावे असे नाते आता आमच्यात नाही. तिने लग्न केला तीच्या मर्जीने, माझा लग्न झाला माझ्या मर्जीने. आता खरेतर तिने यायला नको, असा राजरोस स्वप्नात येणं, शोभत नाही तिला, आणि नम्रताने बघितला तर ? तिला काय वाटेल ?

पण तरीही ती आली. येऊन मन हेलावून गेली. माझी मात्र झोप घालवून गेली. असे नाही ती तिचा येणं मनाला आवडत नाही, असेही नाही कि खूप आवडतं. पण गेला काळ मी विसरू पाहत आहे. ती मात्र मध्येच येऊन शेकडो प्रश्न समोर उभे करून जाते. ती कुठेतरी आपला निर्णय चुकला असे सांगून जाते आणि मी मात्र माझा काय चुकले हा विचार करत असतो. ती मला सुखी बघून गालात हसून निघून जाते, आणि मला मात्र तिच्याविषयी काहीच माहिती नाही.

मी, आज आनंदात आहे. एकदा हरवलेले प्रेम मला लग्नानंतर पुन्हा मिळाले आहे. बायको माझी मला हवी तशीच आहे, सुंदर, प्रेमळ, समजूतदार... मग हे प्रश्न का ? कुणासाठी ?

गालिबचा एक सुंदर शेर आहे ह्यावर.

"हुई मुद्दत के गालिब मर गया, पर अब भी याद आता है,
वोह हर एक बात पे केहना के यो होता तो क्या होता ?"

आजही एखादे सुंदर दृश्य एकट्याने बघताना माझे डोळे पाणावतात, मन क्षणभर बोलून जाते...

" जग जिंकायला मी समर्थ होतो, पण तू तुझे पाय मागे घेतलेस.
आज तू जवळ असायला हवी होतीस... तुझ्या नजरेतून हे जग बघण्याचा कैफ काही और असता..
तू असायला हवी होतीस, बघायला की दुनिया बदलते, परिस्थिती बदलते.
आज सर्व सुख पायाशी असताना तू हवी होतीस जवळ, पुन्हा ते हळवे क्षण द्यायला."

No comments: