Tuesday, August 20, 2013

अस्तित्व..

बाजारपेठेतील एका वळणावर ते कुत्रे बसले होते. गटारात यथेच्छ लोळून, अंगना सगळी घाण लाऊन आपल्या जखमा चाटत लुद भरलेले पोट घेऊन उन्हाचा शेक घेत.
येणारा जाणारा तुच्छतेचा कटाक्षही न देता त्याला टाळून पुढे जात होता. दिवस सुट्टीचा होता, आणि बाजार भरत आलेला. त्या कुत्र्याचे अस्तित्व आता लोकांना खटकू लागले होते.

काही टोळभैरव उगाच त्याची मजा घेत उभी होती. त्यांचा संवाद असा:
" काय राव हे कुत्रे ? साले जगायची खाज ती किती ? भेनxxxx वास किती मारतेय ते ?"

"अबे वास काय घेऊन बसला ? खरुज बघ किती आहे ती ? लेक खाजवून खाजवून मरत कसा नाही ते ?"

"कातडी पण नाही राव अंगावर. कसा थंडीवार्याचा जगतय कायकि ?"
"साली असली कुत्री मारून टाकली पाहिजे.. काय ?"

"नुसती मारून काय उपयोग? जाळून टाकली पाहिजे. राखणीला उपयोग नाही, आणि वर रोगराईला आवतन "

कुठूनसा "पांडुरंग पांडुरंग" असा आवाज येऊ लागला आणि हे टोळभैरव जरा चपापले. वीणेचा नाद जवळ येऊ लागला तसे ह्यांची कुजबुज थांबली.

एक पागोटेवाला जवळ येउन थांबला तसे समस्तास अचंभा वाटला.

त्या शांत निष्पाप चेहऱ्याने एकदा त्या कुत्र्याकडे बघितले आणि शब्द बाहेर आले:

" अरे वाह ! मोत्याहून शुभ्र आहेत कि तुझे दात. किती शुभ्र ? त्यांनी लोकांना चावू नको बरे ! फक्त आपल्या मालकाचे रक्षण करण्यासाठी त्यांचा उपयोग कर हो.."

लुद भरलेले ते कुत्रे २ क्षण खाजवणं थांबवून त्याच्याकडे बघू लागले. जणू काही म्हणत होते
"बाबा लोक श्या देतात, तू का म्हणून तारीफ करू लागलाय ?"

त्या शांत प्रसन्न चेहऱ्याकडे बघता बघता अचानक त्याला आपल्यातील बदल जाणवू लागला, अंगाची खाज गेली, शुभ्र असे केस सगळीकडे आले, सगळी रोगराई पळाली.

असे का घडले असेल ? ह्याचा विचार मी आज करतो, त्याला उत्तर चमत्कार घडला असे नाही.

आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली, कि सगळी गणिते आपोआप सुटतात. आता वाट माझ्या अस्तित्वाची आहे. अजून कळले नाही, पण जेव्हा कळेल त्या क्षणाची वाट बघतो आहे.

Tuesday, June 18, 2013

आपले ते कार्ट..

एक गाव होता. त्यात २ शेतकरी होते. एकच नाव रामा, एकच गोविंदा.

एके वर्षी पेरणी होती. रामाने गहू लावला, गोविंदाने ऊस. रामाकडे होती विहीर, गोविंदाकडे पाउस. देवाची करणी... पाउस काही पडला नाही. गोविंदाचा ऊस करपून गेला. गोविंदा बिचारा उदास झाला. रामाचा गहू मात्र खूप आला. तसा रामा गोविंदाला म्हणाला "चालायचा रे ! होते देवाची करणी.. करपते पीक.. पाउस पडला नाही त्याला आपण काय करणार ?"

दुसर्या वर्षी रामाने ऊस लावला. गोविंदाने सोयाबिन. गोविंदाचा शेत फोफाहून आला. रामाचा पीक वाटले तेवढे नाही आले. रामा उदास झाला. गोविंदाला म्हणाला " गाभ्रीचा पाउस.. पडलाच नाही.माझी वाट लावली.."

कहाणी इथे संपते.. काय सांगते ?

आपला ते बाळ, दुसराच ते कार्ट. आपला ते दुक्खं, दुसर्याचा तो बहाणा..
 

Wednesday, May 29, 2013

A New beginning ?


And I thought it was all over, until I realized that Life did not quit being a tough fighter...

Tomorrow would be a the start of a new fight.. I have to fight the unknown to live and let my loved ones live peacefully. Until then I rest and gather my strength to prove once again that I am and would be a born survivor...

Friday, January 25, 2013

जेव्हा मी माझा असतो..

जेव्हा मी माझा असतो..


रातीच्या काळ्या किनाराला जेव्हा पहाट उजेडाची किनार देते.. तेव्हा मी माझा असतो..
संथ वाहणाऱ्या नदीला जिथे गती येणं थांबतं...तेव्हा मी माझा असतो..
मला काय वाटते, मला कसे वाटते, मला का वाटते ह्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा जग मागत नाही... तेव्हा मी माझा असतो..

मी माझा असतो तेव्हा जग निद्राधीन झालेले असते.. आणि जे जागे असतात ते डोळे घट्ट मिटून मला दाखवतात ... आम्ही तर झोपलो आहोत.. आम्हाला काय ठाऊक तुला की म्हणायचं आहे ते..
बहुतेक तुला वेड लागले असावे.. जग कित्ती कित्ती सुंदर आहे.. बघ तरी..  सगळे कसे निरागसपणे तुझ्या असण्यावर प्रेम करत असतात ते.
मग ते प्रेम मला का दिसत नाही ? कि मी प्रेमआंधळा आहे ? मायेचा स्पर्श मला का होत नाही ? कायम व्यावहारिक विचार का दिसतात ? खरच सांगतो तेव्हा मी माझ्यात नसतो..

एक दिवस येईल की मला जे मागायचे होते ते द्यायला लोक ओंजळ भरभरून पुढे करतील..
तेव्हा चंदनाच्या हाराखाली तसबिरीत.. मी माझा नसेन.... मी आहे म्हणून कुणाचे पाऊल पुढे चालले नाही.. मी नसेन तेव्हा कुणाचे अडणार नाही..
सामान्य मी.. असाच जाणार की हो एकदाचा .. त्यात काय एवढे ?

आज मात्र माझ्या जेत्या समयी.. मी कुणाचाच नाही... जिथे माझ्या असण्यावर माझाच विश्वास नाही.. तिथे मात्र मी नक्कीच माझा मी असतो..