Sunday, April 10, 2011

२०११ ची पहिली कविता..

---------------------------------------------------
जिच्याशिवाय पावलोपावली अडत, जिच्याशिवाय जगणं कठीण होता.

जी जवळ असली की रागावता येत आणि दूर गेली की मन सैरभैर होता..

जिचा खांदा माझ्या हुंदक्याची वाट बघतो, आणि मी मात्र तिचे अश्रू रुमालाने पुसतो..

तू म्हणतेस "अमित तुझ्याकडून माझे कौतुक कधीही होत नाही... तू कधी मला चांगले म्हणत नाहीस.".. पण वेडे आपलच कौतुक कोणि करतो का ?

जिचा कौतुक चारचौघात मी कधीही करत नाही, पण माझे वेडे मन जिच्याशिवाय पळत नाही.. त्या माझ्या आयुष्याततील शेवटच्या प्रेमासाठी...
---------------------------------------------------

काळ काम वेगाचा गणित सोडवताना हिशोब वयाचे राहून गेले,
घर बांधता बांधता घरपण मागे राहून गेले.

मनात कितीही योजिले होते तुझ्यासाठी,
भरभरून ते सगळे तुला द्यायचे राहून गेले.

कधीतरी एकांत वेळी आता आठवत काय ते,
करूया करूया म्हणत प्रेम तुझ्यावर करायचे राहून गेले.

सरणावर आता पसरुनी, मना एकच वाटते,
प्याले दोन डोळ्याचे, रिते करायचे राहिले.

No comments: