मनात अनेक "असे का.. ?" प्रश्न आहेत.. यादी संपतच नाही.. दिवसागणिक त्यात वाढ होते आहे.
आजकाल... पहाटेची वेळच सापडत नाही... सकाळचे कोवळे ऊन डोळ्यात सलते.. पाखरांची किलबिल ऐकू येत नाही... दुपारची भूक आणि जेवणातील तृप्ती गायब झाली आहे... सांजवेळ कातरून येते आणि मन रात्रीच्या भयाण शांततेच्या जाणीवेने थरथरू लागते.. असे का.. ?
रागातील आलाप आणि गझलेतील शब्द कानावर तर पडतात, पण हृदयातील स्पंदने पूर्वीसारखी ऐकू येत नाहीत. शब्दापेक्षा अर्थ आणि सुरापेक्षा गोंगाटाची जाणीव अधिक होते.. असे का.. ?
दिवसाला पानेच्या पाने वाचणारे माझे डोळे आता एक पानदेखील पुरेसे वाचू शकत नाहीत... असे का.. ?
नकार अनेक पचवले मी.. पण आपल्याच लोकांचे नकार पचवताना आज जड जाते आहे.. असे का.. ?
आसक्ती होती ज्या गोष्टींची... आज त्या नकोश्या वाटत आहेत. जिद्द जिथे अस्मानाची होती.. तिथे आज पंख थकल्याची जाणीव आहे.. एक निर्विकार अशी स्तिथी आहे.. वासना.. भूक.. इच्छा.. अशी नाहीच.. कुठेतरी मी हरवलो आहे.. शोधतो आहे.. पण आतुन कंटाळा आला आहे... कशाला शोधायचा ? कुणासाठी ? त्याने काय होईल ?..
माझ्यातला मीच हरवलो आहे.. आणि गंमत म्हणजे शोधावासा वाटत नाही.... निराश नाही.. हताश नाही.. हतबल नाही.. हरलो नाही.. असे का.. ?
कदाचित हेच असेल... कदाचित हे ही विरून जाईल.. उद्याची आशा नाही... आजची पर्वा नाही.. कदाचित असेच जगत राहावे लागेल..
जेथे पुसणारे राहिले नाहीत.. तिथे असले प्रश्न न सोडवलेलेच बरे..